राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाच्या ढगांनी गर्दी केली आहे. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा नवा इशारा देत राज्यात पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सापाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यंदा र्नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेत भारतात दाखल होण्याची चिन्हे आहेत. केरळमध्ये 27 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवलाय.
र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या वर्षी 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती. तसेच नियोजित वेळेच्या आधीच म्हणजेच 30 मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तशीच स्थिती असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केरळमध्ये र्नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यत: 1 जूनच्या आसपास दाखल होतो. यंदा देशात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत105 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच राज्यातही सर्वदूर चांगला पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
हवामान विभागाने पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिलाय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार असून कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत.
12 मे – संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तसेच मध्य महाराष्ट्रात – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर