मोठी राजकीय बातमी : राष्ट्रवादी कोणाची? घड्याळ कोणाला मिळणार? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
मोठी राजकीय बातमी : राष्ट्रवादी कोणाची? घड्याळ कोणाला मिळणार? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
img
Dipali Ghadwaje
सर्वोच्च न्यायालयात आज  राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची ? तसंच, राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याबाबतचा निकाल येण्याची शक्यता आहे.  

या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.   यामुळे राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच हा निकाल येण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. तसं झाल्यास राष्ट्रवादी पक्षासह घड्याळ (चिन्ह) नेमकं कोणाचं यावरून देखील आता कायमचा पडदा उठणार आहे.

राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे अनेकांना धक्का बसला होता. या धक्क्यातून राज्यातील जनता सावरते न सावरते तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील असाच बंड झाला.

अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्ष फोडत 40 हून अधिक आमदार आपल्याबाजूने करत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आधी निवडणूक आयोगात याबाबत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा लढा झाला. ज्यात आयोगाने राष्ट्रवादी अजित पवार यांना दिली.

फक्त पक्षच दिला नाही तर बहुमताच्या जोरावर पक्षाचे चिन्हही दिले. ज्यामुळे शरद पवार यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सध्या सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी कोणाची? यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (ता.25) सुनावणी होणार असून ती दुपारी 12 वाजल्यानंतर होणार आहे.   यामुळे आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान आता स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. पण त्याआधी राष्ट्रवादी कुणाची? याचा निर्णय सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group