राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु चालू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळाला दिला. यावेळी रोहित पवार यांनीदेखील भाषणात अजितदादांविषयीच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी ते भावुक देखील झाले होते.
सभाग्रहात बोलताना, यावेळी रोहित पवार म्हणाले, अजित पवार हे सभागृहात पहिला येणारा आणि शेवटी जाणारा नेता असायचे. चुकले तर कान पकडायचे व चांगले बोललो की स्तुती करायचे. व्यक्तिगत, बेकायदेशीर विषय घेऊन आलेल्यांचा त्यांना राग यायचा. दादांवर नको नको ते आरोप झाले. दादा तेव्हा अस्वस्थ व्हायचे. पण एकही आरोप सिद्ध करता आला नाही. दादा आता नाहीत, त्यामुळे ते आरोप व ते डाग आता पुसले पाहिजेत. आरोपांचे गाठोडे समुद्रात टाकले गेले तर ती त्यांना आदरांजली ठरेल, अशी मागणीही त्यांनी केली.