सर्वोच्च न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा, महिला वकिलाच्या कृतीमुळे थेट कोर्ट मार्शल बोलावावे लागले; नेमकं घडलं काय ?
सर्वोच्च न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा, महिला वकिलाच्या कृतीमुळे थेट कोर्ट मार्शल बोलावावे लागले; नेमकं घडलं काय ?
img
वैष्णवी सांगळे
सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (3 डिसेंबर) मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर मोठा राडा झाला. महिला वकिलाच्या कृतीमुळे थेट कोर्ट मार्शल बोलावावे लागले. यामुळे न्यायालयाची कार्यवाही काही काळ खोळंबली होती. 

न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्यासह असलेल्या या खंडपीठापुढे एका खटल्याची सुनावणी सुरू असताना अचानक एक महिला वकील बिनदाखल्याची खंडपीठासमोर उभी राहिली आणि आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या हत्येचा विषय काढला. आणि कोर्टात एकच गोंधळ उडाला. 

तिने सांगितले की, ती मुंबईत असताना दिल्लीतील एका गेस्ट हाऊसमध्ये तिच्या मैत्रिणीची हत्या झाली. तिने अग्निशमन दलाला मृतदेह पाहायला सांगितले होते आणि आता स्वतःलाही जीवाची भीती वाटत असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. मुंबई पोलिस आयुक्तांना भेटण्याची आणि प्रकरणाचा तपास योग्यरित्या व्हावा अशी मागणी तिने केली. 

विशेष म्हणजे, सुरुवातीला एफआयआर नोंदवण्यास नकार देणार्‍या अधिकार्‍यालाच आता तपास अधिकारी नेमल्याचा आरोप तिने केला. हे ऐकून मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शांतपणे पुढील केस, कृपया असे म्हणत दुसर्‍या प्रकरणाकडे वळण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला वकील कोर्टरूम सोडण्यास तयार नव्हती. 

खंडपीठाने तिला मदत करण्यासाठी दुसर्‍या वकिलाची व्यवस्था करून दिली, पण त्यासाठी देखील ती तयार नव्हती. अखेर मुख्य न्यायमूर्तींनी वरिष्ठ वकील मल्होत्रा यांना तिची समजूत काढण्यास सांगितले. वरिष्ठ वकील मल्होत्रा यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावरच ती ओरडली आणि माझ्याशी असे बोलू नका, तुम्ही कदाचित वकीलही असाल असे उद्गार काढले. 

यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आणि खंडपीठाला कोर्ट मार्शल बोलवावे लागले. मार्शल आल्यानंतर तिने गार्डलाही असभ्य वागणे थांबव असे सुनावले. कोर्टरूममधील गोंधळ एवढा वाढला की मायक्रोफोन लगेच बंद करावा लागला. शेवटी खंडपीठाने तिला योग्य कायदेशीर मदत मिळेल असे आश्‍वासन दिल्यानंतर आणि महिला न्यायालयीन अधिकारी तसेच वरिष्ठ वकिलांच्या मदतीने तिला शांत करून कोर्टरूममधून बाहेर काढण्यात यश आले. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group