तारीख ठरली!  राष्ट्रवादी आणि शिवसेना कुणाची? 'या' दिवशी सुप्रीम कोर्टात एकत्र सुनावणी होणार
तारीख ठरली! राष्ट्रवादी आणि शिवसेना कुणाची? 'या' दिवशी सुप्रीम कोर्टात एकत्र सुनावणी होणार
img
Dipali Ghadwaje
मुंबई : शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात  सुनावणी पार पडणार होती. मात्र पवार गटाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रकरण सारखंचं असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवर शुक्रवारी एकत्रित सुनावणी घेणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं.. 

एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याची लढाई सुरू असतानाच आता दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाकडून आमदार अपात्रतेसंबधी याचिका दाखल करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई करावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान आमदार अपात्रतेसंबधीच्या सुनावणीची तारीख ठरली आहे. आमदार अपात्रतेसंबधीची पुढील सुनावणी शुक्रवारी (13 ऑक्टोबर)ला पार पडणार आहे. दरम्यान शिवसेना 16 आमदार आणि राष्ट्रवादी प्रकरणी एकत्र सुनावणी शुक्रवारी पार पडेल अशी माहिती समोर आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील आमदार अपात्रतेची सुनावणी आता एकत्रितपणे पार पडणार आहे. शुक्रवारी 13 ऑक्टोबर)ला ही सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना अपात्रतेची सुनावणी आधी पुढच्या महिन्यात पार पडणार होती, मात्र, आता ती शुक्रवारी (13 ऑक्टोबर) ला पार पडणार आहे.

आता शिवसेना (ठाकरे गट) सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिकेवर एकत्र सुनावणी होईल. सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे निर्देश 13 तारखेला देऊ शकतंय या सुनावणीकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group