आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. वक्फ (सुधारणा) कायद्यामधील काही महत्त्वाच्या तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने आज तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्याशिवाय केंद्र सरकारने परिस्थिती जैसे थे ठेवावी असेही कोर्टाने सांगितले आहे. केंद्र सरकारला दोन कलमांवर उत्तर देण्यासाठी कोर्टाने सात दिवसांचा अवधी दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने नव्या वक्फ कायद्यामधील दोन तरतुदीला अंतरिम स्थगिती दिली आहे. पूर्ण वक्फ कायद्याला कोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला आहे.
त्याशिवाय या काळात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ, या कालावधीत वक्फ मालमत्तांशी संबंधित कोणतीही नवीन कारवाई किंवा अधिसूचना जारी केली जाणार नाही. सुप्रीम कोर्टाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे.
कोणत्या २ तरतुदीवर तात्पुरती स्थगिती?
वक्फ वापरत असलेली जमीन अथवा मालमत्तेची कोणताही अधिसूचना जारी करू नये.
वक्फ बोर्ड आणि परिषदांवर कोणतीही नियुक्ती करू नये.