
१६ ऑक्टोबर २०२४
नवी दिल्ली : भारतातील न्यायव्यवस्थेसाठी प्रतिकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या स्वरूपात आता मोठा बदल करण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील असणारी काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे.
तसेच आधी ज्या हाती तलवार होती त्या हाती संविधान दिसत आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे.
प्रतिकात्मक दृष्टीने पाहिले तर काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेली न्यायदेवतेचा नवीन पूतळा हा न्याय आंधळा नसतो असा स्पष्ट संदेश देत असल्याचं सांगितलं जातंय. तो संविधानाच्या आधारे काम करतो.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. मात्र असे आणखी पुतळे बसवणार की नाही हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही.
न्यायदेवतेच्या नव्या पुतळ्यात काय विशेष आहे?
Copyright ©2025 Bhramar