सायबर चोरट्यांनी सरन्यायाधीशांनाही सोडलं नाही! चंद्रचूड यांच्या नावानं मागितले ५०० रुपये , काय आहे नेमकं प्रकरण?
सायबर चोरट्यांनी सरन्यायाधीशांनाही सोडलं नाही! चंद्रचूड यांच्या नावानं मागितले ५०० रुपये , काय आहे नेमकं प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
देशात सायबर गुन्ह्यांची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सायबर गुन्हेगार सतत नवनव्या शकला लढवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. कधी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील फोन, तर कधी ओळखीच्या व्यक्तीचा फोन अथवा त्याचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करून लोकांकडे पैसे मागितले जातात. तर, काही वेळा बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जाते. बऱ्याचदा परदेशातील नोकरीचं अमिष दाखवून, फ्रॉड कॉल करून, तर कधी गिफ्ट मिळाल्याचं, लॉटरी लागल्याचं अमिष दाखवून लोकांना लुबाडलं जातं. या सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या गुन्ह्यांची परीसीमा गाठली आहे. सायबर गुन्हेगारांनी आता थेट भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

'नमस्कार, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ.. कौन बनेगा करोडपती से' धीरगंभीर आवाजातील हे वाक्य आपणपैकी बहुतेकांनी ऐकले असेल. पण, थेट'' 'मी सरन्यायाधी धनंजय चंद्रचूड बोलतो आहे.. जरा 500 रुपये पाठवू शकाल का', असे तुमच्या पैकी कोणी ऐकले आहे काय? जर तुम्हालाही तसा मेसेज आला असेल आणि तुम्ही खूश झाला असाल तर, सावधान! तुम्ही गंडला गेला आहात.

सोशल मीडियावरुन अनेकांना या वाक्याने गंडा घातला असून, तुम्ही त्याच रांगेत आहात असे समजून जा. कारण, न्यायधीशांनी असा कोणालाही फोन अथवा संदेश पाठवला नाही. सामान्य नारिकांकडून पैसे उकळण्यासाठी कोणा अज्ञात सायबर गुन्हेगाराने ही शक्कल लढवली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा असून पोलीस आणि न्यायालयानेही दखल घेतली आहे.

सरन्यायाधीशांच्या नावे संदेशामुळे खळबळ

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याच नावाने फसवणूक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेकांना प्राप्त झालेल्या संदेशात म्हटले आहे की, नमस्ते, मी सरन्यायाधीश आहे आणि कॉलेजियमच्या महत्त्वाच्या बैठकीस निघालो आहे. पण, मी कनॉट प्लेसमध्ये अडकलो आहे. आपण मला 500 रुपये पाठवू शकता का? याच संदेशात पुढे म्हटले आहे की, कोर्टात पोहोचल्यानंर पुढच्या काहीच वेळात मी पैसे परत पाठवेन. दरम्यान, व्हयारल झालेल्या या पोस्टची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांच्या निर्देशावरुन सायबर फसवणुकीची तक्रारही देण्यात आली आहे.  

सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

दरम्यान, सरन्यायाधीशांच्या निर्देशावरुन सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, सोशल मीडियावर अनेकंना न्या. चंद्रचूड यांच्या नावाने संदेश पाठवणारा महाभाग आहे तरी कोण याचा तपास सुरु केला आहे.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group