"त्या" प्रकरणात बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा!
img
Dipali Ghadwaje
सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांना मोठा दिलासा दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी प्रसिद्ध केलेल्या माफीनाम्याच्या भाषेवर कोर्टाने समाधान व्यक्त केलंय. तसेच दोघांनाही पुढील सुनावणीला कोर्टात वैयक्तिक हजर राहण्यापासून देखील सूट दिली आहे.

पतंजली फसव्या जाहिरात प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीला बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांनी जाहिर केलेल्या माफीनाम्यावर कोर्ट पुढे काय आदेश देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. आज या प्रकरणात सदर  माफीनामा  कोर्टाने मान्य केला आहे.

आधिच्या सुनावणीत काय झालं होतं.

या आधी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने म्हटलं होतं की, तुम्ही जेवढ्या आकाराच्या जाहिराती छापल्या होत्या तेवढ्याच आकाराचा माफीनामा छापला आहे का? तुम्ही छापलेल्या जाहिरातींच कटिंग कोर्टाला पाठवा, अशा सूचना न्यायमूर्ती हीमा कोहली यांनी दिल्या होत्या.

तसेच बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना पुढील दोन दिवसांत ऑन रेकॉर्ड माफीनामा देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. यामध्ये आमची चूक झाली असे लिहिण्याचे आदेश देखील कोर्टाकडून देण्यात आले होते. त्यावर बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना ऑन रेकॉर्ड माफीनामा सादर केला.

माफीनाम्यात काय म्हटलंय?

भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे/आदेशांचे पालन न करणे यासाठी आम्ही वैयक्तिकरित्या जबाबदार आहोत. (रिट याचिका क्र. 645/2022). तसेच, कंपनीकडून बिनशर्त माफी मागितली आहे. 22.11.2023 रोजी मीटिंग/पत्रकार परिषद आयोजित केल्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत. जाहिरात प्रकाशित करताना आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल आम्ही मनापासून दिलगीरी व्यक्त करत आहोत. अशाप्रकरच्या चुका पुन्हा होणार नाहीत, याचे आम्ही वचन देतो, अशा शब्दांत बाबा रामदेव यांनी वर्तमानपत्रात माफीनाफा सादर केला होता. त्यानंतर कोर्टाने त्यांना ऑन रेकॉर्ड माफीनामा देण्यास सांगितला होता.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group