बाबा रामदेव यांना मोठा धक्का! पतंजलीच्या
बाबा रामदेव यांना मोठा धक्का! पतंजलीच्या "या" 14 उत्पादनांवर बंदी
img
Dipali Ghadwaje
अत्यंत गाजावाजा करत योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतजलीची वेगवेगळी उत्पादनं बाजारात आणली. आपली उत्पादनं इतरांपेक्षा वेगळी असून नैसर्गीक वनस्पतींपासून बनवण्यात आल्याचा दावाही केला. त्यासाठी कोट्यवधींच्या जाहिरातीही केल्या. मात्र पतंजलीच्या उत्पादनांचा पर्दाफाश झालाय. पतंजलीच्या एक दोन नव्हे तर तब्बल 14 उत्पादनांवर बंदी घालण्यात आलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मसी कंपनीच्या १४ उत्पादनांवर बंदी घातलीय. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याने या उत्पादनांवर बंदी घालण्यात आलीय.

पतंजलीच्या ज्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये पतंजली दृष्टी आय ड्रॉप, स्वसारी गोल्ड, स्वसारी वटी, ब्रॉन्कॉम, स्वसारी प्रवाही, स्वसारी अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत अॅडव्हान्स, लिवोग्रिट आणि आयग्रिट गोल्ड यांचा सामावेश आहे.

उत्तराखंड सरकारनं ही कारवाई केलीय. याशिवाय योगगुरु बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्या विरोधात ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आलीय. पतंजलीनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group