योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी सरकारी यंत्रणांच्या रडारवर आली आहे. पतंजली आयु्र्वेद लिमिटेडचे काही संशयास्पद व्यवहारांवर सरकारने स्पष्टीकरण मागितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , कॉर्पोरेट अफेयर्स मिनिस्ट्रीने कंपनीला नोटीस धाडली आहे. आर्थिक गुप्तचर विभागाला कंपनीचे काही देवाणघेवाणीचे व्यवहार संशयास्पद वाटले आहेत. या व्यवहारातील रकमेचा अद्याप खुलासा झालेला नाही. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी कंपनीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
मंत्रालयाकडून कंपनीचे कामकाज आणि पैशांचा वापर कशा पद्धतीने होतो याचीही तपासणी करणार आहे. मंत्रालयाने याबाबतीत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पतंजली आयुर्वेदच्या प्रवक्त्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.