नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना उन्हाळाच्या सुट्टीकालीन पीठाने जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार आहे.
अरविंद केजरीवाल यांनी तब्येत ठीक नसल्याच्या कारणावरून तपासण्या करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे. केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात मिळालेला जामीन वाढवण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन पीठाचा जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती महेश्वरी यांनी सरन्यायाधीशांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. सरन्यायाधीश यावर सुनावणी घेतील, असे न्यायमूर्ती महेश्वरी म्हणाले. सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना २ जूननंतर पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार आहे.