'घड्याळ' चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दिले ''हे'' आदेश
'घड्याळ' चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दिले ''हे'' आदेश
img
दैनिक भ्रमर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महत्वाचे आदेश दिले आहेत. पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याच्या जाहिराती पुढील 36 तासांत वृत्तपत्रात प्रसिध्द कराव्यात, असे कोर्टाने म्हटले आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घड्याळ निवडणूक चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. मात्र, आजही न्यायालयाने तसा आदेश दिला नाही. शरद पवार म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला त्यांच्या जाहिरातींमध्ये घड्याळ निवडणूक चिन्हाखाली, प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्याचे लिहिण्यास सांगितले होते की. मात्र त्याचे पालन होत नाही.

आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्ही त्यांना (अजित पवार गटाला) निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे, पण ते काही अटींच्या अधीन आहे. 24 तासांच्या आत किंवा जास्तीत जास्त 36 तासांच्या आत अजित पवार गटाने वृत्तपत्रांमध्ये घड्याळ चिन्हाखाली डिस्क्लेमर प्रसिद्ध करावा. 

दरम्यान , बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बलबीर सिंह यांनी दावा केला की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुप्रीम कोर्टाने चिन्हाबाबत दिलेल्या सुचनांचे पालन करत आहे. तसेच पक्षाने याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी वृत्तपत्रांशी संपर्कही साधला आहे.’ त्यावर कोर्टाने किती तासांत जाहिरात प्रकाशित करणार, असा प्रश्न केला. सिंह यांनी दोन-तीन दिवस असे उत्तर देताच न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 24 तास किंवा जास्तीत जास्त 36 तासांत जाहिरात प्रसिध्द करा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.




इतर बातम्या
Join Whatsapp Group