विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून सांगलीच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधासभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान , शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. एवढंच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पाटील यांचा प्रचार देखील करण्यात येणार आहे.
सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांना राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे. रोहित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं महेश खराडे यांनी जाहीर केलं. एवढंच नाही तर तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रोहित पवार यांचा प्रचार देखील करण्यात येणार आहे
दरम्यान , या मतदारसंघातून एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी दहा उमेदवारांनी विविध पक्षांच्या वतीनं अर्ज दाखल केला आहे तर तेरा उमेदवार हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.