आज राज्यभरात विधासभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल येण्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षण करण्यात आले. या पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीला राज्यात 122 ते 186 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 69 ते 121 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतर अपक्षांना 12 ते 29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
तसेच, पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50, राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्याची शक्यता आहे. तर महाविकासआघाडीत काँग्रेस हा सर्वाधिक जागांवर यश मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसला 28 ते 47 जागांवर यश मिळू शकतो. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागा आणि ठाकरे गटाला 16 ते 35 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार आकडेवारी खालीलप्रमाणे
महायुती : 122-186 जागा
भाजप – 77 ते 108 जागा
शिवसेना शिंदे गट – 27 ते 50 जागा
अजित पवार गट – 18 ते 28 जागा
महाविकासआघाडी : 69 ते 121 जागा
काँग्रेस – 28 ते 47 जागा
ठाकरे गट – 16 ते 35 जागा
शरद पवार गट – 25 ते 39 जागा
पी-मार्क याच्या अंदाजानुसार
महायुती – 137 ते 157 जागा
महाविकासआघाडी – 126 ते 146 जागा
इतर – 2 ते 8 जागा
झी AI अंदाजानुसार
महायुती – 114 ते 139 जागा
महाविकासआघाडी – 105 ते 134 जागा
इतर – 0 ते 8 जागा
झी न्यूज यांच्या अंदाजानुसार
महायुती – 129 ते 159 जागा
महाविकासआघाडी – 124 ते 154 जागा
इतर – 0 ते 10 जागा
लोकशाही रुद्र अंदाजानुसार
महायुती : 122-186 जागा
भाजप – 80 ते 85 जागा
शिवसेना शिंदे गट – 30 ते 35 जागा
अजित पवार गट – 18 ते 22 जागा
महाविकासआघाडी : 125-140 जागा
काँग्रेस – 48 ते 55 जागा
ठाकरे गट – 39 ते 43 जागा
शरद पवार गट – 25 ते 39 जागा
इतर – 18 ते 23 जागा