प्रकाश आंबेडकरांना धक्का !  ''या'' बड्या नेत्याने सोडली साथ
प्रकाश आंबेडकरांना धक्का ! ''या'' बड्या नेत्याने सोडली साथ
img
दैनिक भ्रमर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून पक्षांच्या प्रचाराच्या रणधुमाळी सुरू आहेत.  प्रत्येक पक्ष सर्वोतपरी प्रयत्नांनी निवडणुकीची रेस जिंकण्याच्या तयारीला लागले आहेत. या दरम्यान, नेत्यांचे आरोप प्रत्यारोप तसेच पक्षांतराचे नाट्यमय राजकरण रंगले आहे. 

 याच दरम्यान मात्र, प्रकाश आंबेडकर यांना आपलाच गड असलेल्या अकोल्यत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलात.‌ डॉ. संतोष हुशे उद्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातल्या वाडेगाव येथील उद्धव ठाकरेंच्या सभेत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

डॉ. हुशे हे वंचित बहुजन आघाडी गेल्या 30 वर्षांपासून आंबेडकरांसोबत कार्यरत आहेत. माळी समाजातील मोठे प्रस्थ अशी हुशे यांची ओळख आहे. अकोला जिल्ह्यात वंचितमधील प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. अकोला पूर्व मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे डॉ. हुशे नाराज होते. अशातच त्यांना वंचितची साथ सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group