विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून प्रेत्येक राजकीय पक्ष आपली रणनीती आखत आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान आता उद्धव ठाकरे गट ही निवडणुकांसाठी सज्ज झाले आहे .
विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहेत. या बैठकीतून उद्धव ठाकरे किती जागा लढवणार, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत 100 ते 105 जागांवर लढण्याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकासआघाडीमध्ये उद्धव ठाकरे 100 ते 105 जागा लढण्याच्या तयारीमध्ये आहेत.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या कॅम्पेनला उद्धव ठाकरे घटस्थापनेपासून सुरूवात करणार आहेत. विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचं थीम सॉन्गही तयार आहे.
उद्धव ठाकरेंनी मागचे 10 दिवस महाराष्ट्रातील वेगवेगल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला, त्यानंतर आता उद्धव ठाकरे गुरूवारी दुपारी 1 वाजता शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे.