निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय , राजकीय वर्तुळात खळबळ
निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय , राजकीय वर्तुळात खळबळ
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळपास शांत झाली आहे. राज्यात १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांचा निकाल उद्या (२३ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजल्यापासून जाहीर होईल.

यंदा तीस वर्षांत पहिल्यांदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालंय. तर मतदानात्तोर चाचण्यांमध्ये महायुतीत सत्ता स्थापन होऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आलाय.

जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार, युती किंवा आघाडीला अपक्ष किंवा लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांची जुळवाजुळवही करण्यास सुरुवात झाली आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 

दरम्यान, या निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांचा भाव चांगलाच वधारला आहे. महायुतीने सत्ता स्थापन केल्यास आम्ही महायुतीला पाठिंबा देऊ, अशी उघड भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. आता, प्रकाश आंबेडकर यांनीही सत्ता स्थापनेसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ.”
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group