काँग्रेसला सर्वात मोठा धक्का ; बडा नेता अजितदादांच्या गळाला
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का ; बडा नेता अजितदादांच्या गळाला
img
DB
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते आपल्या राजकीय सोईनुसार पक्षबदल करत आहेत.  असे असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सानंदा यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही निश्चित झाली आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशावेळी त्यांचे हजारो कार्यकर्तेही अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

येत्या 12 जून रोजी सानंदा यांचा अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार आहे. त्यांच्या या प्रवेश सोहळ्याला अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group