नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील हालचाली वाढल्या आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आज नाशिकमध्ये आगमन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार , मागील आठवडयातत्यांचा दोन दिवसांचा दौरा ठरला होता. मात्र अचानक तो रद्द झाला होता. आज त्यांचा दौरा असल्याने राजगड येथे सकाळपासूनच मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते.
राज ठाकरे यांचे मनसे चे सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष सलीम मामा शेख, सुदाम कोंबडे, अंकुश पवार यांनी स्वागत केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत , तसेच गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.