स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला आहे. गावित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नाशिकमध्ये गावित यांच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. गावित यांचे नाशिकच्या राजकारणात मोठं वजन आहे, त्यामुळे आता ठाकरे काय रणनिती करणार? याकडे शिवसैनिकांच्या नजरा खिळल्या आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाची मानली जातेय. त्याआधीच गावित यांच्यासारखा विश्वासू चेहऱ्याने साथ सोडली, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
निर्मला गावित आज एखनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याशिवाय इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमधील ५ सभापती , १ जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह अनेक माजी सरपंच आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यामध्ये आज गावित आणि इतरांचा पक्ष प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ठाण्यामध्ये पक्ष प्रवेश सोहळा होत आहे.