अखेर राज्यातील महापालिकांच्या निवडणूक संपल्या अन निकालही समोर आले आहे. पण आता महापौर पद नेमके जाणार कोणाकडे यासाठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पक्ष बहुमताच्या आकड्यापासून सूर असल्याने दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. पण महापौर आमचाच असा हट्टहास पक्षांकडून केला जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांना धक्का मुंबई महापालिकेत धक्का मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या महापाैरपदावरून विविध दावे केले जात असतानाच आता उद्धव ठाकरे यांना धक्का बसू शकतो कारण ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. देवाची इच्छा असेल तर आमचा महापाैर होऊ शकतो, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट म्हटले. मात्र,आता उद्धव ठाकरे यांचेच नगरसेवक नॉच रिचेबल झाल्याने ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. उद्धव ठाकरे यांचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
बहुमत मिळूनही विरोधी बाकावर बसण्याची इच्छा नगरसेवकांची नसल्याने ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. सध्या त्यांचे फोनही नॉट रिचेबल आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून केले जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत राज्याच्या राजकारणात पुन्हा नवीन वादळ येईल की काय ? याकडे सर्वांच्याच नजरा आहे.