नाशिकमध्ये ठाकरे गट व मनसेच्या बैठकीत ‘राडा’;
नाशिकमध्ये ठाकरे गट व मनसेच्या बैठकीत ‘राडा’;
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकमध्ये ठाकरे गट व मनसेच्या पदाधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व होते. ही बैठक सुरू असताना ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये जोरदार ‘राडा’ पाहायला मिळाला. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्यावरून ठाकरे गटातील दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. जयंत दिंडे यांनी वसंत गिते यांच्या पराभवाची काही कारणे सांगितली. ते बोलत असताना विनायक पांडे संतापून उठले. 

सावधान ! ३0 हजार रुपये प्रतितोळा दराने सोने अन... मोठी फसवणूक

40 वर्षे आम्ही आमचा लढा देत होतो. इतकी वर्षे आम्ही नेमकं काय केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पांडे नंतर तडकाफडकी बैठकीतून निघून गेले. दिनकर पाटील यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र पांडे काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group