भाजप आणि शिवसेना उबाठा गटाचे वाद काही लपून नाही. त्यात आता भाजप पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे संबंध सुधारण्यावर भर देत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रात नसून राजधानी दिल्लीमध्ये यावर खलबतं सुरू असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. यामागे थेट बिहारची निवडणूक केंद्रबिंदू मानली जात आहे. कारण बिहार निवडणुकीत नीतीश कुमार यांची जेडीयू आणि भाजप सोबत असली तरी यांमध्ये नीतीश कुमार यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी आहे.
बिहारमध्ये पुन्हा भाजप जेडीयूचे सरकार आले तर नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा सांगतील. मात्र पुन्हा नीतीश कुमार यांच्या हाती बिहारची सूत्र देण्यास भाजपमधून विरोधी सूर आहे. निकालानंतर भाजपच्या जर जास्त जागा आल्या तरी बिहार सत्तेमध्ये जेडीयूच वर्चस्व राहावं यासाठी नीतीश कुमार यांचे नेते आग्रही आहेत. बिहार निवडणुकीत सत्तेचा वाद झाला तर प्रत्येक निकालानंतर पलटूराम म्हणून नीतीश कुमारांची खाती आहे. केंद्रातल्या आकड्यांच्या समीकरण बिघडल्यास पूर्वाश्रमीच्या मित्रासोबतच नातं चांगलं असावं. यासाठी दिल्ली भाजपकडून ठाकरे यांच्या सोबतच्या संबंधांवर भर दिला जात असल्याची माहिती आहे.