आमदारांना मिळाला आयफोन 16 प्रो, पेपरलेस विधानसभेची सुरुवात
आमदारांना मिळाला आयफोन 16 प्रो, पेपरलेस विधानसभेची सुरुवात
img
वैष्णवी सांगळे
सरकारच्या पेपरलेस कामकाजाच्या उपक्रमाला गती देण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विधानसभेचे कामकाज अधिक वेगवान होण्यासाठी दिल्लीच्या भाजप सरकारने मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या "एक राष्ट्र, एक अॅप्लिकेशन" या संकल्पनेअंतर्गत राष्ट्रीय ई-विधान अॅप्लिकेशन उपक्रमाच्या उद्घाटनादरम्यान आमदारांना आयफोन देण्यात आले.

‘खालिद का शिवाजी’; राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गोंधळ, मुख्यमंत्री म्हणाले, तुमचं म्हणणं ऐकलं, कार्यक्रमात..

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह दिल्ली विधानसभेतील सर्व ७० आमदारांना नुकतेच आयफोन 16 प्रो, आयपॅड आणि टॅबलेट देण्यात आले आहेत. पेपरलेस कामकाजाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय ई-विधान अॅप्लिकेशनच्या शुभारंभावेळी आमदारांना आयपॅड आणि टॅबलेट देण्यात आले. दिल्लीमधील सर्व ७० आमदारांना मागील महिन्यात याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. विधानसभेचं कामकाज पेपरलेस आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group