विधानपरिषद निवडणूक मोठी खबरदारी ; आमदारांचा मुक्काम 5 स्टारमध्ये, हॉटेलचं एका दिवसाचं भाडं किती?  कशी आहे राजकीय पक्षांची फिल्डिंग? वाचा
विधानपरिषद निवडणूक मोठी खबरदारी ; आमदारांचा मुक्काम 5 स्टारमध्ये, हॉटेलचं एका दिवसाचं भाडं किती? कशी आहे राजकीय पक्षांची फिल्डिंग? वाचा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक उद्या,शुक्रवारी होणार आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आमदारांची फाटाफूट होऊ नये, यासाठी मोठी खबरदारी ठेवली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना फाईव्ह स्टारमध्ये ठेवलं आहे. या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं १५ हजारांहून अधिक आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांची सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केली आहे. आमदारांची फाटाफूट रोखण्यासाठी राजकीय पक्षांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं १५ ते २५ हजार रुपये इतके आहे. या हॉटेलचा संपूर्ण खर्च कोण करतंय, असा सवाल उपस्थित होत आहे.

भाजपचे आमदार हे मुक्कामासाठी प्रसिडेंट हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलचं एका दिवसाचं भाडे १५ ते २० हजार रुपये इतके आहे. तर शिंदे गटाच्या आमदारांचा मुक्का ताज लँड्समध्ये आहे. या हॉटेलचंही एका दिवसाचं भाडे १५ ते २५ हजार रुपये इतके आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांनीही खबरदारी घेतली आहे. ठाकरे गटाचे आमदार आयटीसी मराठा हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्या हॉटेलचं भाडं हे १२ ते १५ हजार रुपये इतके आहे. अजित पवार गटाच्या आमदारांचा मुक्काम द ललीत हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलचं दिवसाचं भाडं १५ ते २० हजार रुपये इतके आहे. या सर्व आमदारांच्या राहण्याचा खर्च कोण उचलणार, अशी राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. 

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत कोणाचा विजय होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group