मनोज जरांगे पाटलांचा सोशल मिडिया रोहित पवारांकडून मॅनेज ;
मनोज जरांगे पाटलांचा सोशल मिडिया रोहित पवारांकडून मॅनेज ; "या" आमदाराचा दावा
img
Dipali Ghadwaje

सोलापूर :  गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे.

या दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीतील आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका केली होती.  त्यानंतर, आमदार राऊत यांनीही जरांगेंना थेट आव्हान दिलं. त्यावरुन मनोज जरांगे आणि आमदार राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसून येते.

 आमदार राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्या सोशल मिडिया टीमकडून होत असलेल्या टीकेंवर बोलताना आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केलं. मनोज जरांगे यांचा सोशल मिडिया रोहित पवार यांच्याकडून मॅनेज केला जातं असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. तसेच, शरद पवार यांचा बार्शी दौरा झाल्यापासूनच बार्शीत माझ्याविरुद्ध राजकारण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात शांतता रॅली काढली होती. त्यानंतर, आता घोंगडी बैठकांच्या माध्यमातून ते मराठा समाजातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र, जरांगेंच्या बैठका किंवा दौऱ्यासाठी रोहित पवारांची टीम सोशल मिडिया मॅनेजमेंटचं काम करते, असा दावा आमदार राऊत यांनी केला आहे. जरांगे यांचे जिथे आंदोलन आहे, तिथं रोहित पवारांची टीम आधी जाते. सगळी व्यवस्था होते, मगच सगळं आंदोलन केलं जातंय. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या घरी शरद पवार येऊन गेले तेव्हापासून हे सुरु आहे, मला वाटतं हे सगळं कट कारस्थान रोहित पवार यांनी केलंय, असा माझा संशय आहे, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आमदार राऊत यांच्या आरोपावर आता रोहित पवार काय भूमिका मांडणार हे बघणं महत्वाचं ठरेल .  

इतर बातम्या
Join Whatsapp Group