ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. २९ ऑगस्टला सुरु होणाऱ्या आंदोलनात आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे ओबीसी समाजानेही साखळी उपोषणाची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
माझी दोन्ही समाजाला विनंती आहे, दोन्ही समाजासाठी शासन काम करेल. ओबीसी समाजाने लक्षात ठेवावं आम्ही सर्व प्रश्न सोडवू, मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले, इतर कुणीही प्रश्न सोडवले नाहीत. मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं आहे, कोर्टात टीकलेलं आहे. मी आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे. आता मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या म्हणतात, ओबीसीमध्ये अगोदरच 350 जाती आहेत. मात्र, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं आहे.
हे ही वाचा
लोकशाहीत सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाही पध्दतीने जेवढी आंदोलन होतील त्याला आम्ही सामोरे जाऊ. कुठलेही आंदोलन होवो, लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये, उच्च न्यायालयाने काही नियम निकष तयार केले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका मांडली.