आरक्षणावरून महाराष्ट्र तापला... राजधानीत मराठा तर उपराजधानीत ओबीसी
आरक्षणावरून महाराष्ट्र तापला... राजधानीत मराठा तर उपराजधानीत ओबीसी
img
वैष्णवी सांगळे
मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठ्यांचे वादळ मुंबईमध्ये धडकले आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये ओबीसी समाजानेही आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून उपोषण सुरू केले. आरक्षणावरून महाराष्ट्रातील फडणवीस सरकार कोंडीत सापडले आहे.  एकीकडे मुंबईमध्ये मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरु केले आहे , तर दुसरीकडे आमच्यातील आरक्षण कुणालाही देऊ नये, त्यासाठी ओबीसीने उपराजधानी नागपूरमध्ये साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. 

कुणबी प्रमाणपत्राबाबत मराठ्यांना मोठा दिलासा; घेतला 'हा' मोठा निर्णय

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी आजपासून आम्ही आंदोलन करत आहे, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली. तहसीलदार वंशावळ जुळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्यांच्याकडे नोंदी आहेत, त्यांना देण्यास हरकत नाही. आम्ही आजपासून साखळी उपोषण सुरू करत आहे, गरज पडल्यास आम्ही मुंबईला जाण्यासाठी तयारी करू, असेही बबनराव तायवाडे म्हणालेत. आज नागपुरात साखळी उपोषण सुरू होत आहे, टप्प्या टप्प्याने इतर जिल्ह्यात आम्ही आंदोलन करू असेही बबनराव तायवाडे म्हणालेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group