मोठी बातमी! CM फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर, सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण
मोठी बातमी! CM फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर, सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण
img
दैनिक भ्रमर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्ताधारी पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात भाषण करताना फडणवीस यांनी ही ऑफर दिली. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सभागृहात उपस्थित होते. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात उद्धव ठाकरेंना ऑफर देताना म्हंटलं की,  '2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही. तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे.' फडणवीस यांनी भर सभागृहात ही ऑफर दिल्यानं नवी चर्चा सुरु झाली आहे.विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्यानंतर उद्धव ठाकरेचं सभागृहात भाषण झालं. त्या भाषणात ठाकरे यांनी या वक्तव्यावर काहीही बोलणं टाळलं. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण पहायला मिळेल कि काय ? हे येणाऱ्या दिवसात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group