महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतातील पिकेच नाही तर माती आणि भविष्याची स्वप्नेही पाण्यात वाहून गेली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. अनेकांची जनावरेही या पुराच्या पाण्यात वाहून गेली. झालेले नुकसान पाहून अनेक शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. विरोधक आणि शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची सरकारकडून मागणी केली. तसेच ओला दुष्काळ करण्याचीही मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खास पॅकेज जाहीर.
- जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसान भरपाई
- तत्काळ मदत म्हणून १० हजार रुपये तसेच गहू तांदूळ देण्यात आले.
- पडलेली घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद.
- डोंगरी भागातील घरांना दहा हजार अधिकची मदत.
- नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला मदतीची तरतूद.
- NDRF चे निकष काही प्रमाणात काढून टाकले आहेत.
- विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार
- ४७ हजार एकरी खरवडून गेलेल्या जमिनींना मदत.
पीक नुकसानभरपाई
- शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये
- हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई - हेक्टरी 27 हजार रुपये
- बागायती शेती नुकसान भरपाई - हेक्टरी 32 हजार रुपये
- विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये
- कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार
- बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना 50 हजारांहून अधिक मदत मिळेल.
- जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी
- दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत
- गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार
- कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी
- नष्ट, पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत
- डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत
- झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार
दोन हेक्टरपर्यंत एनडीआरएफ आणि केंद्राचे नॉर्म्स असतात, त्यावरील भार आम्ही उचलला आहे. बारकाईने विचार करत कोणताही घटक वंचित राहणार नाही असा विचार केलाय. भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, जर काही राहून गेलं तर त्याचा समावेश करण्याची देखील आमची तयारी आहे, अशी माहिती यावेळी उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.