गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीसांच कौतुक , 'सामना'तून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं
गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीसांच कौतुक , 'सामना'तून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं
img
Dipali Ghadwaje
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळल्याचे पाहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यांनी केलेल्या या दौऱ्याची सामनातून स्तुती करण्यात आली आहे. ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी गडचिरोलीला ‘पोलादी सिटी’ अशी नवीन ओळख मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असे सामना अग्रेलखात म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आज सामनातून देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक करण्यात आलं आहे.

यावेळी  ‘गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा ‘विडा’ आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल.

तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत !, असे समानातून म्हटले आहे.’

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group