नाशिक जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या, समस्यांच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. शिकसेना ठाकरे गट आणि मनसेचे अनेक पादधिकारी, कार्यकर्ते मोर्चादरम्यान उपस्थित राहणार आहेत. याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नाशिकमध्ये महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे त्यामुळे नाशिक शहराची पूर्ण वाट लागली आहे. या शहरात लोकांना पाणी नाही, रस्ते नाही, सुविध नाहीत. गुंडगिरी वाढली आहे. नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्स, एमडी ड्रग्सचा व्यापार सुरू आहे. तरूण मुलांना ही ड्रग्स सहज उपलब्ध होत आहेत. या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत.
हेच नाशिक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तकघेतलेलं आहे, मात्र नाशिक अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या अशा अनेक समस्यांचा पाढाच राऊतांनी यावेळी वाचून दाखवला. यावेळी देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शहरात फिरून परिस्थिती पाहण्याचे आव्हान थेट राऊत यांनी दिलं आहे.