अमृता फडणवीसांबद्दल प्रख्यात गायिकेची गलिच्छ टीका, बलात्कारावर मत मांडताना ओलांडली मर्यादा
अमृता फडणवीसांबद्दल प्रख्यात गायिकेची गलिच्छ टीका, बलात्कारावर मत मांडताना ओलांडली मर्यादा
img
वैष्णवी सांगळे
भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कार विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत टीका केली आहे. या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओवर टीकेची झोड उठली असतानाच राजकीय व्यक्तींनी देखील अंजली भारती यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. 

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर , चित्रा वाघ, संजय निरुपम यांनीदेखील निःशेष नोंदवला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या "सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या पत्नी अमृता फडणवीस जी यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केलेले आहे, त्या वक्तव्यांचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकडून गायिका अंजली भारती यांचा निषेध करते" अशी पोस्ट किशोरी पेडणेकर यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवर केली आहे.

चित्रा वाघ यांनी देखील विधानाचा निषेध नोंदवत संताप व्यक्त केला आहे.  "श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे?हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रध्येय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहितीये. जय हिंद | जय महाराष्ट्र | जय भीम

तर संजय निरुपम यांनी गायिका अंजली भारती यांच्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. म्हणाले,   लज्जास्पद विधान! ही महिला मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्काराची वकिली करत आहे. माता आणि बहिणींवरील अत्याचाराला विरोध केला पाहिजे, पण अशा प्रकारे नाही. निषेध! निषेध! निषेध!' अशा शब्दात शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही अंजली भारती हिच्यावर टीका केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group