मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे. आज घरोघरी गणपती बाप्पा बसत आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबई मार्चचा आज श्रीगणेशा झाला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधवांनी कूच केली आहे. हायकोर्टाने मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली असतानाच जरांगे पाटील हे निघाले आहेत. अंतरवाली सराटी महादेवाचे दर्शन घेऊन आणि बाप्पाची विधीवत आरती करून त्यांनी आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
हे ही वाचा
त्यांच्यासोबत अनेक जण मुंबईकडे रवाना झाले आहे. आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा मार्ग निवडला आहे. तर काल मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना आरोप केला होता की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आरक्षणाचं काम करू दिलं नाही, त्यानंतर आज माध्यमांच्या प्रश्वावरती उत्तर देताना एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणावर बोलू देत नाहीत असा मोठा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.
हे ही वाचा
मी घेतलेल्या निर्णयावर ठाम आहे, मी मुंबईकडे निघालो आहे, आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही त्यांना जन्मभर विसरणार नाही, नाही सहकार्य केलं तर कमीत कमी तो समाजासमोर उघडा पडेल. त्यांचे नेते एकजुटीने लढत आहेत. आता यांनाच काय झालंय, आता आम्हाला गरज आहे. राजकीय पक्षातील मराठे, सत्ताधारी, विरोधक आणि श्रीमंत मराठे यांची आम्हाला गरज आहे, असंही जरांगेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
हे ही वाचा
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगेपाटीलांचा पहिला मुक्काम जुन्नर शहरात असणार असून मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी अपेक्षित असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा २८ ऑगस्ट रोजी होणारा शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेत .