ओबीसी कोट्यातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले होते. दरम्यान , धनगर आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण मागे घेतले आहे. धनगर आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वदीगोद्री येथे ओबीसी महिला आणि मुलींच्या लीं हाताने पाणी घेऊन उपोषण सोडलं आहे. उपोषणाच्या ७ व्या दिवशी हाकेंनी उपोषण सोडलं आहे.
एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेले काही दिवस झाले उपोषणाला बसले होते. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या पूर्ण व्हाव्यात तसेच , मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले होते. दरम्यान त्यांनी नुकतेच आपण उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान त्या पाठोपाठच धनगर आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण मागे घेतले आहे.