मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये ओबीसी समाजानेही आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून उपोषण सुरू केले होते. आरक्षणावरून महाराष्ट्रातील फडणवीस सरकार कोंडीत सापडले असताना आता मनोज जरांगे यांच्या गावी म्हणजेच अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी नेते उपोषणाला बसणार आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसण्याची ओबीसी आंदोलकांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. मात्र प्रशासनाने या आंदोलकांना आंदोलनाचे स्थळ तसेच आंदोलनाला बसणाऱ्या इतर लोकांची माहिती देण्याचं कळवले आहे. या उपोषणाने मराठा - ओबीसी संघर्ष उफाळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
दरम्यान आंदोलनाचे स्थळ तसेच आंदोलनाला बसणाऱ्या इतर लोकांची माहिती देण्याचं कळवले आहे. या बाबीची पूर्तता केल्याशिवाय आंदोलकांच्या परवानगीचा निर्णय घेता येणार नसल्याचे पोलिसांनी आंदोलकांना कळवलंय. दरम्यान अंतरवाली सराटी परिसरातील सोनियानगर येथे ओबीसी आंदोलक ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे.