"निलेश यांनी त्यांना समजावून सांगावे अन्यथा ....." ; मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा
img
DB
सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते. जे उमेदवार असतील, त्यांनी कागदपत्रे काढून ठेवावी. पाडायचे की लढायचे, हे २९ ऑगस्टला ठरणार आहे. आम्ही राज्यातल्या २८८ जागा लढण्याची तयारी करत आहोत, अशी माहिती मनोज जरांगे- पाटील यांनी रविवारी आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानांसंदर्भात जरांगे म्हणाले की, मी सर्वांचा आदर करतो. ते नवीन काय काढायला लागले मला माहीत नाही. ओबीसींवर आमच्यामुळे अन्याय होणार नाही

हेही वाचा >>> पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी? शिवामूठ वाहण्याचे काय आहे महत्व? वाचा

नारायण राणे यांना इशारा 
खा. नारायण राणे यांनी जरांगेंना शनिवारी आव्हान दिले. यावर जरांगे म्हणाले की, त्यांनी मराठवाड्यात येऊ नये, असे आपण कधी बोललेलो नाही. निलेश यांनी त्यांना समजावून सांगावे. मला धमक्या देऊ नका. मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही. 
 
 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group