'तर मराठे नक्षलवादी होऊन' ... मराठा आरक्षणावरुन छावा संघटनेचा सरकारला इशारा
'तर मराठे नक्षलवादी होऊन' ... मराठा आरक्षणावरुन छावा संघटनेचा सरकारला इशारा
img
दैनिक भ्रमर
मराठा आरक्षणावरुन राज्यात राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील लातूर जिल्ह्यात शांतता रॅली काढत आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी जरांगे पाटील करत आहे. दुसरीकडे आरक्षणासाठीच्या लढ्याचा आणि समाजाचा राजकीय उपयोग करून घ्याल तर ठोकूण काढणार, असा इशारा छावा संघटनेने दिला आहे. आचार संहिता लागण्याआधी जर आरक्षण दिलं नाही तर नक्षलवादी होऊन तुमचा काटा मराठे काढतील, असा इशाराच छावा संघटनेने दिला आहे.

दरम्यान , आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बगल देण्यासाठी सुपारी फेक, शेण फेक अशा घटना घडवून लक्ष दुसरीकडे वळविळ्याचा प्रयत्न होत आहे. जर समाजाचा आणि आरक्षणासाठीच्या लढाईचा उपयोग राजकारण करण्यासाठी कोणी करत असेल तर छावा संघटना त्यांना ठोकून काढेल, असा आक्रमक इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

यासोबतच जर येत्या विधानसभा निवडणुकीच्या आत आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही तर मराठा समाजातील तरुण नक्षलवादी होतील आणि तुमचा काटा काढतील, असा देखील इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबरोबर ओबीसीमधुनच नाही तर कुठूनही आरक्षण द्या अस देखील यावेळी छवाचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group