येत्या 23 तारखेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतली. पैठण फाटा येथील छत्रपती भवन येथे जरांगे यांच्यासोबत सामंत यांनी चर्चा केली आहे. मागच्या दोन वर्षांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत.
मागचं उपोषण सोडताना सरकारनं जरांगे यांना आश्वासन दिलं होतं. आता आश्वासनाची मुदत संपत आहे. त्याआधी सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली. येत्या 23 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे यांच्या मागण्यासंर्दभात चर्चा करणार असल्याचं सामंत यांनी म्हंटलंय.