'.... तर राहिलेली शिवसेना सुद्धा संपेल' ; गिरीश महाजनांचा राऊतांना टोला
'.... तर राहिलेली शिवसेना सुद्धा संपेल' ; गिरीश महाजनांचा राऊतांना टोला
img
Dipali Ghadwaje
मंत्री गिरीश महाजन यांनी  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांवर  निशाणा साधत महाजन यांनी म्हटलंय की, त्यांनी उद्धव साहेबांना शरद पवार अन् कॉंग्रेसच्या मांडीवर बसवलं, ही दलाली पाहा.

बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना संपवली. उद्धव यांना विनती आहे, थोडीफार राहिलेली शिवसेना वाचवा. मी साठ वर्षे काय केलं? हे सर्वाना माहिती आहे. गोरेगाव पत्राचळीत काय केलं? हे मला बोलायला लावू  नका. तुम्ही शिवसेना संपवली, उद्धव यांना संपवलं शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. राऊतांची बडबड अशीच सुरु राहिली, तर राहिलेली शिवसेना सुद्धा संपेल, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

शिवसेनेत कोणी राहिलं आहे का?

35 वर्षे मी सात वेळा भाजपामधून निवडून आलोय. आम्हाला कुठेही जायची गरज नाही. पक्ष कोणाच्या दावणीला बाधायचं काम मी करत नाही, असंही महाजन यांनी म्हटलं आहे. सुधाकर बडगुजर काय बोलतात, शिवसेनेत कोणी राहिलं आहे का? संजय राऊतसारखा माणूस असताना दुसऱ्या माणसाची गरज नाही. तर खडसे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप

धारावी पूनर्वसनाची सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. नियमबाह्य काम केलं जाणार नाही. जागा कमी पडत असेल तर शासन देईल, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. स्वतः उद्धव ठाकरे. यांनी काही केले नाही विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. सरकारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले. ते समोर आलंय, हे योग्य नाही. ज्या महिला  पैसे परत  करतील, त्यांच्यावर नाही. पण ज्या महिला पैसे परत करणार नाही, त्यांच्यावर काहीतरी निर्णय घेऊ शकतो असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला आहे.
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group