''पुन्हा उपोषणाला बसणार..'', मनोज जरांगेंनी सरकारला  दिला ''हा'' इशारा, म्हणाले...
''पुन्हा उपोषणाला बसणार..'', मनोज जरांगेंनी सरकारला दिला ''हा'' इशारा, म्हणाले...
img
दैनिक भ्रमर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी खूप दिवसांपासून लढा देत आहेत, दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी 
बोलताना याबद्दलची माहिती दिली.

तसेच , “आम्ही स्थगित केलेलं आमरण उपोषण आजपासून पुन्हा सुरु करत आहोत. आज मध्यरात्रीपासून आम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहोत. आम्ही तुमच्याकडे ९ ते १० मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक करु नये. ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना आज स्पष्टच सांगतोय, नंतर आमच्या नावाने तक्रार करू नका. तुम्हाला आत्ताच संधी आहे. मला यात राजकारण करायचं नाही. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आजपासून आमरण उपोषण सुरु करत आहे. तसेच या उपोषणाच्या माध्यमातून आणखी एक संधी सरकारला देत आहे. नंतर आमच्या नावानं आरडाओरड करायची नाही”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“मराठा, कुणबी एक आहेत, असा जीआर लवकरात लवकर काढा. तसेच हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुम्ही या किंवा येऊ नका. आपण आपली प्रक्रिया राबवत असतो, कोणी या म्हणून आंदोलन नसते, फूट पाडणे त्यांचं कामाचं आहे, मला राजकारणाकडे जायचं नाही, आमच्या व्याखेप्रमाणे अंमलबजावणी करा, तिन्ही गाझेट लागू करा, शिंदे समितीने 24 तास काम केले पाहिजे”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group