सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतंरवाली सराटी येथील नऊ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा होणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.
यावेळी मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार आणि मी एक भक्त म्हणून नारायण गडावर जाणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. बीडमधील नारायण गडावर दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
‘मी दसरा मेळाव्याला जाणार आणि बोलणार पण आहे. दसरा मेळाव्याला तुफान मराठा समाज येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी 12 वाजता नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. वेळ 12 वाजेची वेळ ठरलेली आहे. येणाऱ्या सर्व भक्तांना माझी विनंती आहे दर्शन जरी सर्वांचे झालं. तरी 2 वाजेपर्यंत गडावरच राहायचं आहे.’, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.