मराठा आरक्षाणासंबंधी मागण्या पूर्ण व्हाव्यात तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत . सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी ते आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.
दरम्यान आता उपोषणाचा आठवा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळे आंदोलक महिलांकडून पाणी घेण्याची आणि उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे. मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यासाठी महिला आंदोलक रडताना दिसून आल्या. आता मनोज जरांगे पाटील उपचार घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.