आदित्य ठाकरेंना निवेदन द्यायला जाण्याआधीच करण गायकर व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
आदित्य ठाकरेंना निवेदन द्यायला जाण्याआधीच करण गायकर व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - शिवसेना युवा नेते आ. आदित्य ठाकरे यांना संविधानिक पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगळे सोयरे जीआरची अंमलबजावणी तत्काळ करावी याचे निवेदन देणार असल्याचे कळल्यानंतर, पोलिसांनी मराठा समाजाचे कार्यकर्ते करण गायकर व इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

यावर प्रतिक्रिया देताना मराठा समाजाचे बांधव म्हणाले की, विरोधी पक्षाकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी पोलीस प्रशासनाला करण गायकर यांच्यासह समाज बांधवांना ताब्यात  करायला सांगावं. सत्ताधारी पक्षाला आपण वेठीस धराव, समाजाची न्यायिक मागणी मांडावी यासाठी आपणास मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून भेटायला येणार होतो.

विरोधी पक्ष हा सर्वसामान्यांचा आवाज असतो सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणार असतो परंतु या ठिकाणी सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना निवेदनाची किंवा मराठा आरक्षणासंदर्भात गांभीर्य नसल्याचे दिसून येते असा आरोप मराठा सकल समाजाचे समन्वयक व छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केला. ते पौधे म्हणाले की, विरोधात किती दिवस वागणार, मराठा समाजाने प्रामाणिकपणे आपल्याला मतदान केलं. त्या मतदानाची जाणीव ठेवून आपण राज्याच्या सत्ताधारी पक्षाला वेठीस धरण अपेक्षित असताना तुम्ही आंदोलन करणाऱ्या लोकांना वेठीस धरता याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हॉटेल वर येऊन निवेदन देणार नाही, जे कृत्य विरोधी पक्षाने केले आहे त्याची किंमत ही मोजावीस लागेल असा इशारा गायकर यांनी दिला. 

विरोधी पक्षाने हे लक्षात घ्यावे गत लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 30 जागेवर मराठा समाजाचा रोष व्यक्त करून तुम्हाला निवडून दिले.  तुमच्याकडं मराठा समाजाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करत असताना तुम्ही मराठा समाजाच्या भावना समजून न घेता त्या दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर हे निषेधार्थ आहे.  इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडते आहे.

निवेदन द्यायला येतो असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अटक होत असेल तर आपण विरोधी पक्ष म्हणून नक्कीच लोकशाहीला मानता का हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आमचे सरळ निवेदन घेऊन तुमची भूमिका स्पष्ट करावी ही आमची भूमिका असताना तुम्ही अशी चुकीची भूमिका या ठिकाणी का घेतली या प्रश्नाचे उत्तर तुम्ही समाजाला जाहीरपणे द्यावे अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे..
इतर बातम्या
Join Whatsapp Group