मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अमरण उपोषणामुळे खालावली आहे. दरम्यान त्यांना मनोज जरांगे समर्थक आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी उपचार घेण्याची विनंती केली होती. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार घेतले.
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करुन उपचार घेण्याची केली विनंती केली होती. जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. मध्यरात्री पावणेदोन वाजता मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले. मनोज जरांगेंचे सध्या सहावे उपोषण सुरु आहे.
जरांगे पाटील यांना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणं देखील मुश्कील झालं होतं. सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालताना दिसत होते. मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय. ते स्टेजवरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हते. दरम्यान, सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडं सर्वांचं लक्ष आहे.