मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस मुबंईत उपोषण केले. त्यांच्या उपोषणासमोर राज्यसरकाला झुकावे लागले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये मात्र तीव्र नाराजी पसरली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी नागपूरमध्ये ओबीसी समाजाने आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलक उपोषण करत आहेत. अशातच आता या आंदोलनाबाबत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेतली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मुख्यमंत्री ओबीसी नेते तायवाडे यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहेत.