मराठा समाजाला ओबीसीमधून नको, स्वतंत्र आरक्षण द्या; छगन भुजबळांचा  एल्गार
मराठा समाजाला ओबीसीमधून नको, स्वतंत्र आरक्षण द्या; छगन भुजबळांचा एल्गार
img
Dipali Ghadwaje
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ थेट आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे. 70 वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, तर स्वतंत्र आरक्षण द्या, असा एल्गार ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

दरम्यान, भुजबळ मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जातांना त्यांचे अंतरवाली सराटी फाट्यावर समर्थकांकडून भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान, यावेळी बोलतांना भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. तसेच, 17 तारखेला अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन केलं असून, आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचा देखील त्यांनी आवाहन केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जाताना मंडल स्तंभाला अभिवादन करताना अंतरवाली सराटी फाट्यावर भुजबळ यांनी भाषण केले. यावेळी बोलतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर, भुजबळांनी जामखेड फाटा येथे स्वागत स्वीकारताना बांधवांना मोर्चे आणि आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, दहशत माजवून जे मिळेल ते पदरात पाडून घेण्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटलय. सोबतच, 17 तारखेला अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर, कोणत्याही आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचा देखील त्यांनी म्हटले. 

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, आपल्यावर अन्याय होत असेल आणि दुःख झालं असेल तर आपल्याला कोणीही डॉक्टर औषध देणार नाही. त्यामुळे आपल्याला दहशत माजवावी लागेल. समोरच्या दरवाज्यातून एन्ट्री मिळत नाही, म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण मोर्चे काढून एक आवाजात उभे राहावे लागेल. नाहीतर आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य धोक्यात येईल, असे भुजबळ म्हणाले. 

मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया 
छगन भुजबळ यांच्या संभाषणाची एक कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात, "आपण आता करेंगे या मरेंगे हेच करायला पाहिजे आणि आवाज द्यायला पाहिजे, असे म्हणत असल्याचा डाव केला जात आहे. यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. "करेंगे या मरेंगे असे म्हणणे त्यांचा प्रश्न आहे. पण आमचं म्हणणे आहे की, 'लड़ेंगे भी और जीतेंगे भी' असे जरांगे म्हणाले. तर, आम्हाला अजून आरक्षण मिळालेच नाही, अजून लढा सुरु आहे. आम्ही आमच्या हक्काचे मागत असून, कोणावर अतिक्रमण करत नाही. कोण काय बोलत आहे, त्याकडे आता लक्ष न देण्याचे आम्ही ठरवले असल्याचे जरांगे म्हणाले आहे. 


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group