छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? अंजली दमानियांचा मोठा दावा ; राजकीय वर्तुळात खळबळ
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? अंजली दमानियांचा मोठा दावा ; राजकीय वर्तुळात खळबळ
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादीचे बडे नेते अशी छगन भुजबळ यांची ओळख आहे. याच छगन भुजबळ यांची चांगलीच चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका. ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी भूमिका छगन भुजबळ यांनी सातत्याने घेतली आहे.  

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महायुतीत मराठा आणि ओबीसी असे दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे नेते मराठा आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत, तर ओबीसी नेते, छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत. याच मुद्द्यावरुन छगन भुजबळ पक्षात एकाकी पडल्याची चर्चा सुरु आहे. अशातच अशात छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत तसा दावा केला आहे.  

काय आहे अंजली दमानिया यांचे ट्वीट?
अंजली दमानिया यांनी ट्वीट करत म्हटलं की, "भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी छगन भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप."
 


 
मात्र छगन भुजबळ खरंच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून भाजपमध्ये जाणार का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. 


 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group