मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे दु:खद निधन झाले आहे. पूनम गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. यामुळे तिचा मृत्यू झाला. अवघ्या 32 व्या वर्षी पूनमने अखेरचा श्वास घेतला आहे. ही बातमी कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पूनमचं गुरुवारी रात्री निधन झालं’, असं तिच्या टीमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती. त्यात तिच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलं होतं. ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. पूनमचं निधन सर्वाइकल (गर्भाशयाच्या) कॅन्सरने झालं आहे’, असं त्यात लिहिलं आहे.
पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल होती. पूनमने 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पूनमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये झळकली होती. त्यानंतर तिचे फॅनफॉलोईंग प्रचंड वाढले होते.
2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती. भारताने अंतिम सामना जिंकला तर मी स्ट्रिपिंग करेन, असं तिने जाहीर केलं होतं. तिच्या या व्हिडीओची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती.